जरा लवकर जन्मलो असतो तर?

समोरच्याला भारावून टाकणं हा पणशीकरांचा गुणधर्म आहे.  ''तो मी नव्हेच!'' मध्ये ते प्रेक्षकाला भारावून टाकतात तर तोच मी मध्ये वाचकाला . ....तोच मी वाचताना पहिल्यांदा  वयाच्या 80  व्या वर्षी या माणसाला एवढं सगळं डिटेल आठवतं तरी कसं?  असा प्रश्न आपल्याला पडतोच!  पण, लवकरच त्या प्रश्नावर भारावलेपण मात करतं...!
''तोच मी!'' हे पणशीकरांचं प्रतिबिंब आहे.  त्यामुळे त्याबाबत बोलण म्हणजे पंताबाबत बोलणं होय.... सलग  ५० वर्षे निष्ठेने नाटक करणारा , वयाच्या 50 व्या वर्षी  बायपास होऊनही नंतरची 30 वर्षे दमदारपणे ''तो मी नव्हेच!''  चालवणारा हा खराखुरा माणूस आहे.  माझ्यासारख्या तरूणांना  ''निष्ठा कशाखी खातात?'' हे समजून घ्यायचे असेल, तर त्यांना पणशीकरांशिवाय दुसरा पर्याय नाही.
''तोचं मी!'' त्यांच्या या निष्ठेला अधोरेखित करतं, त्यातुन दिसतं ते त्यांचचं अंतर्बाहय रंगकर्मीपण...! पंतांनी आपल्या मेमरीमधलं सगळं खरखुर सांगितलेलं आहे.  त्यांच्या या खरेपणामुळे त्याचं किर्तन रंगत जातं.  तो काळ डोळयासमोर उभा राहतो.  एखादी नाटक कंपनी चालती कशी हे तर समजतचं.... पण, त्यावेळी माणसा-माणसातली निस्सीम नाती होती तरी कशी हेही दिसतं. आज पणशीकरांना कोणी अवलिया म्हणत, तर कोणी देव.  पण, या पुस्तकात आलेली त्यांची धडपड, वाद, निष्ठा, वादानंतरची ही गुरूभक्ती, मानापमान ते एक माणूसच असल्याचं सिध्द करत. माणुस ,पण मोठा माणुस... पण, हे सगळे वाचल्यावर शेवटी एकच वाक्य तोंडी येत ,जरा लवक्र जन्मलो असतो तर...
पंतांच आयुष्य हे एक खुप मोठं चित्र आहे. जे हजारो रंगांनी भरलेले आहे.  वेगवेगळया कार्यक्रमात आपल्या वक्तृत्वाने ते यातले  रंग उधळत असतात.  पण, हे सारे रंग नीट, एकत्र उधळण्याची संधी मात्र त्यांनी गमावली आहे .  ''तोच मी!''  फक्त त्याच्या नाटकाबद्दल बोलत राहत.  शेवटी, शेवटी तर तेही एकजिनसी होत जातं.  पण, याशिवाय त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते जास्त महत्वाच,  जाणण्याजोगं होतं.  वाघ. पणशीकर वाद असो वा त्यांचा लढा हे सगळं लोकांना समजणं फार महत्वाचं होत .निदान मला तस वाटत.  कदाचित त्यांना आता त्यासाठी ''अश्रूंची फुले झाली कशी!'' असं अजुन एक आत्मचिरत्र लिहावं लागेल आणि त्यांनी ते जरूर लिहावं...!कारण ते समजण आजच्या रंगकर्मींची ,समाजाची गरज आहे .
एवढं सगळ लिहायचं कारण म्हणजे पणशीकर, नाटयसंपदा आणि त्यांची नाटक हा गेले अर्धे शतक मराठी सांस्कृतिक विश्वावर प्रभाव पाडणारा महत्वाचा घटक आहे.  ''रंगकर्मी'' च्या निमित्ताने गेली वर्षभर मी प्रायोगिक, समांतर रंगभूमीबद्दल जाणून घेत आहे.  या रंगभूमीने Contnt Enerichiment & quality croud  चे मनोरंजन  अशा दोन विभागात प्रचंड काम केले हे नक्की.  पण, त्याचवेळी पंत Mass पर्यंत पोहचत होते.  आणि, नुसतेच पोहोचत होत असे नव्हे, तर त्यांना काही सांगत होते.  नीट बघितल्यावर असे लक्षात येत की, पणशीकरांच्या प्रत्येक नाटकात काही एक विचार होता.  त्यामुळे एका अर्थाने समाजाच्या फार मोठया Cross section   ला विचार देण्याचे, संस्कारित करण्याचे काम ते करत होते.  ''तो मी...'' ते ''अवघा रंग'' सगळया नाटकातुन हे दिसून येतं. Quality, Quantity & content  या तीन्हीचा सुरेख मेळ साधायचा प्रयत्न त्यांच्यातून होत राहिला.  आणि, म्हणूनच आजही त्यांच्या प्रत्येक कृतीला एक अर्थ असतो.  याशिवाय स्वच्छ चारित्र हा गुण कसा माणूस जगवु शकतो.  याचे ते उदाहरण आहेत.  आणि म्हणून आजच्या पिढीला, काही व्यसनाधीन कलाकारांना ते मार्गदर्शक आहेत आणि, त्यांची गरज भासत राहणार आहे.  Longlive पंत...!
पंतावर खुप सारं लिहिता येईल.  पण, शेवटी पुन्हा पुन्हा वाटतं राहतं की जरा लवकर जन्मलो असतो तर त्यांना अजून जाणून घेता आलं असतं.  ''सो व्हॉट?''करत प्रश्न विचारता आले असते   आणि पंतांच उत्तर ऐकता आली असती. असो, असे अनेक ठेवे आमच्या पिढीने मिस केले आहेत.  हा! पण एक ठेव आहे बर का माझ्याकडं ,मी स्वत: पंताच ''तो मी नव्हेच'' पाहिलं आहे.  त्यांचा ''मी  लखोबा लोखंडे'' हा उच्च्चार कानात साठवलेला आहे.  निदान पुढच्या 2 पिढयांना तरी मी अभिमानाने सांगू शकतो की मी पणशीकरांचं ''तो मी नव्हेच!''  पाहिलयं.
हा ठेवा असा आहे की तो माझ्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही, आणि तेवढं मला नक्कीच  पुरेसं आहे........!

2 comments:

D said...

uttam... keeptup...

Anant Ghotgalkar said...

छानच!शीर्षकातील भावना योग्य पण अगोदर जन्मलेल्यान्पेक्षा तुम्ही जास्त भाग्यवान आहात इतर बहुतेक बाबतीत.आणि तू पणशीकरांचे तो मी नव्हेच पाहिलेस हे वाचून आश्चर्य वाटते,अभिमन्यू !

Post a Comment