पुस्तकांबद्दल ..पण का ???

पुस्तकं.. ती म्हणजे गुरु , ते म्हणजे ज्ञानाचे मोठे साधन . हे सारे तर सगळ्यानाच माहित आहे आणि ते खरेही आहे .. पण ,त्याहुन महत्त्वाचे म्हणजे पुस्तके देतात तो अनुभव ... खुदकन येणारं हसु असु दे वा डोळ्यातुन येणारे अश्रुंचे थेंब... किंवा मग येणारा राग ... हुश्श......

आणि त्यातुनच एखादे पुस्तक वाचल्यावर येणारे विचार ... फार वेगळे असतील वा नसतील ..पण सांगावेत असे ..आणि त्यासाठीच हे पुस्तकांसवे जगताना ..

हे पुस्तकांचे परीक्षण नव्हे आणि ओळख तर नाहीच नाही .. ही आहेत मुक्तके ..एखादे पुस्तक वाचल्यावर काय वाटले ते सांगणारी .. मग क्वचित त्याचा त्या पुस्तकाशी काडीमात्र संबध असणार नाही ..तर क्वचित ते त्या पुस्तकाबद्दलच असेल ..पण ते पुस्तक वाचताना , वाचल्यावर ते सुचले हे निमित्त ... भावनिक बिवनिक नाही , मोठे विचार देणारेही नाही.. पण निदान वाचण्याजोगे ... कोणतीही फिक्स दिशा नाही वा पुस्तकेदेखील ..जे आणि जसे सुचेल तसे ... बघा आवडते का ....

हा प्रवास सुरु राहील दर सोमवारी ..... आणि सर्वात महत्त्वाचे , तुमचेही असे काही अनुभव असतील तर ऐकायला आवडेल .. एक छानशी मैफीलच जमेल त्यामुळे ... सो लेट्स गो ....