समोरच्याला भारावून टाकणं हा पणशीकरांचा गुणधर्म आहे. ''तो मी नव्हेच!'' मध्ये ते प्रेक्षकाला भारावून टाकतात तर तोच मी मध्ये वाचकाला . ....तोच मी वाचताना पहिल्यांदा वयाच्या 80 व्या वर्षी या माणसाला एवढं सगळं डिटेल आठवतं तरी कसं? असा प्रश्न आपल्याला पडतोच! पण, लवकरच त्या प्रश्नावर भारावलेपण मात करतं...!
''तोच मी!'' हे पणशीकरांचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे त्याबाबत बोलण म्हणजे पंताबाबत बोलणं होय.... सलग ५० वर्षे निष्ठेने नाटक करणारा , वयाच्या 50 व्या वर्षी बायपास होऊनही नंतरची 30 वर्षे दमदारपणे ''तो मी नव्हेच!'' चालवणारा हा खराखुरा माणूस आहे. माझ्यासारख्या तरूणांना ''निष्ठा कशाखी खातात?'' हे समजून घ्यायचे असेल, तर त्यांना पणशीकरांशिवाय दुसरा पर्याय नाही.
